महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील घरविहीन कुटुंबांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे स्वतःची घरबांधणीसाठी जमीन नाही, अशा पात्र नागरिकांना आता भूखंड खरेदीसाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे अनेकांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
योजनेचे नाव आणि उद्दिष्ट
या नवीन योजनेला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजना’ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील घरकुलविहीन नागरिकांना स्वतःची जागा उपलब्ध करून देणे, जेणेकरून ते विविध घरकुल योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे घर उभारू शकतील.
किती मिळणार आर्थिक मदत
या योजनेअंतर्गत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या भूखंडासाठी पात्र लाभार्थ्यांना ₹१ लाखापर्यंतचे अनुदान दिले जाईल. जर जमिनीची किंमत ₹१ लाखांपेक्षा कमी असेल, तर पूर्ण किंमत सरकारकडून दिली जाईल. यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या योजनांच्या लाभार्थ्यांना फायदा होणार
हे अनुदान खालील घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना दिले जाणार आहे –


