आता ही योजना सगळ्यांसाठी नाहीये, त्यासाठी काही अटी आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही महाराष्ट्रात राहणारे शेतकरी असायला हवेत. दुसरं, तुमच्या शेतात पाण्याचा स्रोत असावा – मग ती विहीर असो, शेततळं असो किंवा नदी. तिसरं, ही योजना खास करून गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यांचं नाव दारिद्र्यरेषेखाली येतं. आणि हो, तुमच्याकडे किमान १ एकर शेती असायला हवी.
अनुदान ५०% मिळेल, पण बाकीचे ५०% पैसे तुम्हाला स्वतः भरावे लागतील. आणि PVC पाईपसाठी जास्तीत जास्त ५०० मीटरपर्यंतच अनुदान मिळेल.
अर्जासाठी कागदपत्रं काय लागतील?
अर्ज करायचा असेल तर कागदपत्रं तयार ठेवा. काय लागेल ते पाहूया:
आधार कार्ड
मतदान कार्ड
रेशन कार्ड
उत्पन्नाचा दाखला
शेतात पाणी असल्याचं प्रमाणपत्र
बँक पासबुक
शेतीचा ७/१२ किंवा ८ अ
पाईप खरेदीचं बिल किंवा कोटेशन
स्वतःचा मोबाईल नंबर
ही सगळी कागदपत्रं नीट जमा करा, कारण अर्ज करताना याची
अर्ज कसा करायचा?
अर्जाची प्रक्रिया अगदी सोपी आहे. चला, स्टेप्स पाहूया:
सगळ्यात आधी कागदपत्रं तयार करा.
मग महाडीबीटी पोर्टलवर जा (लिंक: mahadbt.maharashtra.gov.in).
नवीन यूजर असाल तर साइन अप करा, नाहीतर तुमचा आयडी-पासवर्ड टाकून लॉगिन करा.
अर्जाचा फॉर्म नीट भरा आणि कागदपत्रं अपलोड करा.
सगळं झालं की सबमिट करा.
मोबाईलवरूनही हे सगळं आरामात करू शकता. फक्त लक्षात ठेवा, अर्ज व्यवस्थित भरला पाहिजे.
मित्रांनो, संधी सोडू नका!
शेतकऱ्यांनो, ही योजना तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. जर तुम्ही जानेवारीत अर्ज करायला चुकलात, तर पुढच्या टप्प्याची वाट पाहा. मी तुम्हाला सगळी माहिती देत राहीन. तुमचा नंबर कमेंटमध्ये टाका, म्हणजे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. ही योजना तुमच्या शेतीला नवसंजीवनी देईल, मग वाट कशाला पाहता? तयारीला लागा आणि अर्ज करायला सज्ज व्हा


