सुधारित पीक विमा योजनेत कोण, किती नुकसान भरपाई देईल? सविस्तर माहिती

योजना नैसर्गिक आपत्ती, जसं की दुष्काळ, पूर, गारपीट, किंवा कीटक आणि रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देते. याशिवाय, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, जसं की ड्रोन आणि mobile app, नुकसान भरपाई जलद मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कोणत्या पिकांना योजनेत समाविष्ट केलं आहे?
2025 च्या खरीप हंगामासाठी सुधारित पीक विमा योजनेत खालील पिकांचा समावेश आहे:

भात (धान)
खरीप ज्वारी
बाजरी
नाचणी (रागी)
मकातूर
मूग
उडीद
सोयाबीन
भुईमूग
तीळ
कारळे
कापूस
कांदा
या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रात शेती करणारे सर्व शेतकरी, मग ते कूळ शेतकरी असोत किंवा भाडेपट्टीवर शेती करणारे, योजनेत सहभागी होऊ शकतात.

सुधारित योजनेतील मोठे बदल
2025 च्या खरीप हंगामासाठी सुधारित पीक विमा योजनेत काही महत्त्वाचे बदल झाले आहेत, जे शेतकऱ्यांना माहित असणं गरजेचं आहे:

एक रुपयात विमा बंद: यापूर्वी महाराष्ट्रात शेतकऱ्यांना फक्त 1 रुपये हप्ता भरून विमा मिळायचा. पण आता खरीप हंगामासाठी 2%, रबी हंगामासाठी 1.5%, आणि नगदी पिकांसाठी 5% हप्ता भरावा लागेल.
केवळ पीक कापणी प्रयोग आधार: यापूर्वी स्थानिक आपत्ती, प्रतिकूल हवामान, आणि काढणीपश्चात नुकसान यांसारख्या चार आधारांवर नुकसान भरपाई मिळायची. आता फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीनुसारच भरपाई मिळेल.
Farmer ID अनिवार्य: योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे Farmer ID असणं आवश्यक आहे.
ई-पीक पाहणी बंधनकारक: तुम्ही जे पीक विम्यासाठी नोंदवलं आहे, ते ई-पीक पाहणीत नोंदवलं गेलं पाहिजे. जर यात तफावत आढळली, तर विमा अर्ज रद्द होऊ शकतो.
पीक विम्यासाठी अर्ज कसा करायचा?

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत