जुनी विहीर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना मिळणार १ लाखांपर्यंत अनुदान, असा करा अर्ज
शेती ही आपल्या देशाची पारंपरिक आणि मुख्य व्यवसायाची ओळख आहे. पण शेती करताना सर्वात मोठं आव्हान म्हणजे पाण्याची उपलब्धता. गावखेड्यात आजही अनेक जुन्या विहिरी आहेत ज्या पाण्याच्या टंचाईमुळे किंवा देखभालीअभावी निकामी झालेल्या आहेत. अशा विहिरी दुरुस्त करून पुन्हा वापरात आणल्या गेल्यास शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळू शकतो. आणि म्हणूनच राज्य सरकारने अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी “बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना” सुरू केली आहे.


