शेतकऱ्यांना ४८० कोटी देण्यास मान्यता; मदत वाटप सुरू
अतिवृष्टी आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागातील जिल्ह्यांसाठी ४८० कोटी ३७ लाख रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यामध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशीम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यासाठी ही मदत देण्यात येणार आहे.
ऑक्टोबर पगार दिवाळीपूर्वी बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक 20251015 222210 0000
ऑक्टोबर पगार दिवाळीपूर्वीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक ॥ राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज. State Employees October Salary
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे.
अमरावती विभागातीलअकोला जिल्ह्यासाठी ९१ कोटी १२ लाख ५८ हजारबुलढाणा जिल्ह्यासाठी २८९ कोटी २७ लाख २८ हजारवाशीम जिल्ह्यासाठी ३४ कोटी ६४ लाख ८४ हजारजालन्यासाठी ८३ लाख ८४ हजारहिंगोलीसाठी ६४ कोटी ६१ लाख ८३ हजारअशी एकूण ४८० कोटी ५० लाख ३८ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे.


