असा अर्ज करा
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. शहरात असो वा खेड्यात, सगळीकडे कनेक्टिव्हिटी हवी आहे. पण ग्रामीण भागात अजूनही नेटवर्कच्या समस्या मोठ्या आहेत. याच संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या शेतात किंवा घरावर BSNL चा टॉवर बसवून दरमहा 25 ते 30 हजार रुपये कमवू शकता. कसं चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया
BSNL टॉवर बसवण्याची संधी काय आहे?
BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) ही सरकारी टेलिकॉम कंपनी आहे, जी देशभरात आपलं नेटवर्क विस्तारण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
का आहे ही संधी आकर्षक?
BSNL चा टॉवर बसवणं हे एक प्रकारचं passive income मिळवण्याचा मार्ग आहे. यात तुम्हाला फक्त तुमची जागा उपलब्ध करून द्यावी लागते बाकी सगळं काम कंपनी करते. याचे काही प्रमुख फायदे पाहूया:
निश्चित उत्पन्न: तुमच्या जागेच्या स्थानानुसार तुम्हाला दरमहा 25,000 ते 30,000 रुपये किंवा त्याहून अधिक भाडं मिळू शकतं. शहरातील प्रीमियम जागांवर तर ही रक्कम 1 लाखापर्यंतही जाऊ शकते
कमी मेहनत: टॉवर बसवल्यानंतर तुम्हाला काहीही करावं लागत नाही. कंपनी टॉवरची देखभाल आणि ऑपरेशन सांभाळ
तुमच्या जागेच्या स्थानानुसार आणि टॉवरच्या प्रकारानुसार कमाई ठरते. ग्रामीण भागात साधारणपणे 20000 ते 40000 रुपये दरमहा मिळू शकतात तर शहरी भागात ही रक्कम 70,000 ते 1.5 लाखांपर्यंत जाऊ शकते. उच्च क्षमता असलेल्या टॉवर्ससाठी जास्त भाडं मिळतं.

