गाय गोठ्यासाठी सव्वादोन लाखापर्यंत अनुदान

महाराष्ट्र शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी शरद पवार ग्रामसमृध्दी योजना जाहीर केली .यानुसार,शेतकऱ्यांना गाय-म्हशींच्या गोठ्यासाठी आर्थिक मदत मिळते .ही योजना शेळीपालन, कुक्कुटपालन आणी पशुपालन करणार्या साठी आहे .ग्रामीण भागातील पशुपालनाला चालना देन्यासाठी ही योजना राबवली जात आहे
योजनेचे फायदे
*उत्तम आरोग्य:- आधुनिक पध्दतीने गोठा बांधल्यामुळे पशुधनाचे आरोग्य चांगले राहते आणि दुध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते
*सोपे संगोपन :- पशुधनाची निगा राखणे सोपे होते
* आर्थिक दिलासा: गोठा बांधकामासाठी मोठा खर्च स्वत: करावा लागत नाही अनुदानामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होतो
 अर्ज कसा कराल
सध्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागेल
ग्रामपंचायत कार्यालया मार्फत तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयातून संमधीत पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करु शकता
इतर पर्याय ÷ याशिवाय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ही अर्ज करता येतो
गोठा योजना काय आहे
शेतकरी आणि पशुपालकांना त्यांच्या जनावरांचे योग्य रित्या संगोपन आणि संरक्षण करता यावे यासाठी ही गोठा योजना राबवली जात आहे
आवश्यक कागदपत्रे
1) सात-बारा उतारा
2)आधार कार्ड
3)बॅक पासबुक
4) पशुधन असल्याचा पुरावा
6) जागेच्या मालकी हक्काचे कागदपत्रे
अनुदान किती मिळते
दोन ते सहा जनावरांचा गोठा ₹77188
सहा ते बारा जनावरांचा गोठा 1,54,376
तेरापेक्षा अधिक जनावरांसाठी 2,31,534

कोनाला अर्ज करता येनार
+ अर्जदार शेतकरी असने आवश्यक आहे
+ त्याच्याकडे स्वत:ची जागा आसने आवश्यक आहे
+ पशुधन पाळन्याचा अनुभव असावा
+ ग्रामीण भागातील पशुपालकांना या योजनेचा लाभ मिळतो

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत