NRCP BriterMenu
ELI Yojana 2025: बेरोजगार तरुणांसाठी खूप मोठी बातमी! आता मिळणार थेट ₹15,000 – अर्ज कसा करायचा?
देशात बेरोजगारी ही मोठी समस्या बनली आहे. लाखो तरुण शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात आहेत. बेरोजगारीवर सरकारचे धोरण काय आहे या विषयावर अनेक वेळा चर्चा होत असते. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने बेरोजगार तरुणांसाठी एक दिलासादायक योजना जाहीर केली आहे – ELI New Yojana 2025, म्हणजेच रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना. या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना १५,००० रुपये अनुदान दिलं जाणार आहे. तर काय आहे ही योजना चला सविस्तर पाहूया.
ELI New Yojana म्हणजे काय?
१५ हजार मिळवण्यासाठी तुम्ही काय करणार?
ELI योजना साठी पात्रता (Eligibility) काय:
आवश्यक कागदपत्रांची यादी
उद्योग आणि कंपन्यांसाठी सुद्धा मोठा फायदा:
ELI New Scheme चे फायदे:
ELI योजनेसाठी अर्ज कसा कराल?
बेरोजगार तरुणांना मोठी संधी
ELI New Yojana म्हणजे काय?
ELI म्हणजे Employment Linked Incentive – रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने मंजूर केली आहे. सरकारचे उद्दिष्ट आहे की, पुढील २ वर्षांत ३.५ कोटींहून अधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. ही योजना काही प्रमाणात बेरोजगार भत्ता योजनेसारखी वाटू शकते. पण या योजनेमध्ये व त्या योजनेमध्ये अनेक फरक आहेत.
या योजनेसाठी ₹१ लाख कोटींचं बजेट निश्चित करण्यात आलं आहे. ही योजना खास करून अशा तरुणांसाठी आहे, जे पहिल्यांदाच नोकरी करणार आहेत आणि ज्यांना अद्याप कामाचा अनुभव नाही. अशा तरुणांसाठी ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये आशेचा किरण ठरणार आहे.
१५ हजार मिळवण्यासाठी तुम्ही काय करणार?
या योजनेअंतर्गत, जर एखादा तरुण पहिल्यांदाच नोकरीला लागतो, तर सरकार त्याच्या पहिल्या पगाराइतकी रक्कम (कमाल ₹१५,०००) प्रोत्साहन म्हणून देईल. हे प्रोत्साहन दोन हप्त्यांमध्ये मिळणार:
पहिला हप्ता – नोकरी लागल्यापासून ६ महिन्यांनी मिळणार
दुसरा हप्ता – १२ महिन्यांनी मिळणार
ही रक्कम थेट त्या कंपनीला दिली जाईल, ज्यात संबंधित तरुण काम करतो. यामुळे कंपन्यांनाही नवीन उमेदवारांना कामावर घेण्यास प्रोत्साहन मिळेल. व त्या कंपनीचा ही फायदा होईल व या उमेदवारांचाही फायदा होईल व त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन मिळेल.
ELI योजना साठी पात्रता (Eligibility) काय:
उमेदवार भारताचा नागरिक असायला हवा.
वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान असायला हवे.
उमेदवार पहिल्यांदा नोकरी करत असावा (कोणताही पूर्वीचा अनुभव नसावा)
उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले असावे.
उमेदवाराकडे आधार कार्ड, बँक खाते, PAN कार्ड असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रांची यादी
नोकरीचं ऑफर लेटर (कंपनीने दिलेलं)
आधार कार्ड
PAN कार्ड
शैक्षणिक प्रमाणपत्रे
पासपोर्ट साईझ फोटो
बँक खाते तपशील
उद्योग आणि कंपन्यांसाठी सुद्धा मोठा फायदा:
या योजनेत उत्पादन क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. जर एखादी कंपनी नवीन उमेदवाराला २ वर्षे नोकरीवर ठेवते, तर सरकार त्या कंपनीला प्रति कर्मचारी दरमहा ₹३,००० पर्यंत मदत देईल. यामुळे कंपन्या टिकाऊ आणि स्थिर रोजगार देण्याकडे वळतील. त्यामुळे नवीन उद्योग व कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. सरकारचे हे पाऊल खरंच बेरोजगारांना व कंपन्यांना फायदा देणारे आहे.
ELI New Scheme चे फायदे:
बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळणार.
कंपन्यांना नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्यास प्रोत्साहन मिळणार.
उत्पादन आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती होणार.
रोजगार निर्मितीत मोठी वाढ होणार.
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
ELI योजनेसाठी अर्ज कसा कराल?
या योजनेकडे बघितले तर ही योजना सध्या नवीन आहे, तसेच सरकारने नुकतीच जाहीर केलेली आहे. तरुणांना या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा याबाबत संभ्रम निर्माण झालेला असेल.
सध्या या योजनेशी संबंधित अर्ज प्रक्रिया संबंधित पोर्टलवर लवकरच सुरू होणार आहे. यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. अर्ज सुरू झाल्यावर खालील गोष्टी लक्षात ठेवा:
सर्व कागदपत्रांची soft कॉपी तयार ठेवा.
ज्या कंपनीत नोकरी लागली आहे ती नोंदणीकृत असावी. म्हणजेच msme किंवा मोठी कंपनी असावी
कंपनीकडून ऑफर लेटर व जॉइनिंग डेट असलेला पुरावा अपलोड करावा लागेल.
आधार लिंक बँक खात्याची माहिती योग्य प्रकारे भरने आवश्यक आहे.
बेरोजगार तरुणांना मोठी संधी
ELI New Scheme ही बेरोजगार तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. १५,००० रुपयांचं प्रोत्साहन आणि दीर्घकालीन नोकरीची शक्यता या योजनेमुळे तरुणांना आत्मनिर्भर होण्याची चांगली संधी मिळणार आहे. जर तुम्ही किंवा तुमचा कोणी मित्र-मैत्रीण नोकरीच्या शोधात असेल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा.
हा लेख आवडल्यास शेअर करायला विसरू नका.

