मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
आपल्या मोबाईलवरील Google Chrome मध्ये “mahadbt farmer login” असे शोधा.
Agri Login लिंक उघडा आणि दिसणाऱ्या सूचना वाचून OK वर क्लिक करा.
पुढे Farmer ID टाका. जर Farmer ID माहित नसेल तर दिलेल्या लिंकवर जाऊन आधार क्रमांक व OTP टाकून Farmer ID मिळवा.
लॉगिन झाल्यानंतर “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
कृषी यांत्रिकीकरण विभाग निवडा.
कृषी यंत्र अवजार खरेदीसाठी अर्थसहाय्य” हा घटक निवडा.
पुढे “मनुष्यचलित औजारे” अंतर्गत “पिक संरक्षण औजारे” आणि “सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप” हा पर्याय निवडा.
बॉक्स टिक करून “जतन करा” वर क्लिक करा.
अर्ज शुल्क व पेमेंट
या योजनेसाठी अर्ज शुल्क ₹23.60 निश्चित आहे. हे शुल्क शेतकरी UPI, QR कोड, डेबिट कार्ड किंवा इतर डिजिटल माध्यमातून भरू शकतात. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पावती PDF मध्ये सेव्ह करा किंवा प्रिंट काढा.

