तुमच्या गावातील नवीन घरकुल यादी जाहीर: यादीत तुमचे नाव कसे तपासावे? येथे पहा

घरकुल यादी ऑनलाइन कशी तपासावी?
तुमच्या मोबाइलवर घरकुल योजनेची यादी तपासण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा:

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी, तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या अधिकृत वेबसाइट pmayg.nic.in वर जावे लागेल.

२. ‘Awaassoft’ पर्याय निवडा: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, डाव्या बाजूला ‘Awaassoft’ नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा

Report’ विभागावर क्लिक करा: ‘Awaassoft’ पर्यायाखाली ‘Report’ या विभागावर क्लिक करा.

४. लाभार्थ्यांचा तपशील निवडा: आता ‘Beneficiary Details For Verification’ हा पर्याय निवडा.

५. माहिती भरा: येथे तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडायचे आहे. तसेच, ‘२०२४-२०२५’ हे आर्थिक वर्ष आणि ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’ हा पर्याय निवडा.

६. कॅप्चा भरा आणि सबमिट करा: शेवटी, स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड भरा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.

यानंतर, तुमच्यासमोर तुमच्या गावातील घरकुल योजनेची संपूर्ण यादी उघडेल. या यादीतून तुम्ही तुमचे नाव आणि तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकता. या सोप्या पद्धतीने तुम्ही स्वतःच तुमच्या घरकुल यादीची खात्री करू शकता

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत