MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र, (तांत्रिक) आणि प्राचार्य, शासकीय औद्यगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहायक प्रशिक्षणाची सल्लागार, गट-ब (तांत्रिक) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब या संवर्गातील एकूण 0132 पदांच्या भरतीकरीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्हताप्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : MPSC सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾एकूण पदे : 0132 जागा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 47,600/- ते 1,51,100/- रुपये अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र, (तांत्रिक) आणि प्राचार्य, शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, गट-ब (तांत्रिक) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब या संवर्गातील.
◾इतर आवश्यक पात्रता : PDF जाहिरात वाचा.
◾अर्ज शुल्क :
▪अराखीव (खुला) : ७१९/- रुपये.
▪मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग : ४४९/- रुपये.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
◾ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
◾आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 आक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून
