Eklavya Model School Bharti 2025 : भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेली स्वायत्त संस्था, राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था (NESTS) ही पात्र आणि इच्छुक भारतीय नागरिकांकडून एकूण 07267 पदांसाठी प्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, वसतिगृह वॉर्डन (पुरुष आणि महिला), महिला स्टाफ नर्स, अकाउंटंट, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) आणि प्रयोगशाळा अटेंडंट या पदांसाठी थेट भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
एकूण पदे : 07267 जागा भरल्या जात आहेत.
◾पदाचे नाव : प्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, वसतिगृह वॉर्डन (पुरुष आणि महिला), महिला स्टाफ नर्स, अकाउंटंट, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) आणि प्रयोगशाळा अटेंडंट.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 ते 78,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 50 वर्षे.
◾भरती कालावधी : निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला दोन वर्षांच्या कालावधीसाठी परिवीक्षा कालावधी असेल, जो सक्षम अधिकाऱ्यांच्या विवेकबुद्धीनुसार वाढवता येतो. परिवीक्षा कालावधी दरम्यान, परिवीक्षाधीन व्यक्तीची सेवा कोणत्याही वेळी कोणतेही कारण न देता समाप्त केली जाऊ शकते.
◾पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
▪प्राचार्य : उमेदवार पदव्युत्तर पदवी आणि बी.एड/ एमएड उत्तीर्णसह ९/ १२ वर्ष अनुभव धारक असावा.
▪पदव्युत्तर शिक्षक : उमेदवार पदव्युत्तर पदवी/ एमएससी (कॉम्प्युटर सायन्स)/ आयटी/ एमसीए/ एम.ई./ एम.टेक.(कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) आणि बी.एड पदवीधारक असावा.
▪प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : उमेदवार संबंधित विषयातून पदवी आणि बी.एड पदवी धारक असावा.
▪स्टाफ नर्स (महिला) : उमेदवार बीएससी (नर्सिंग) पदवी उत्तीर्णसह किमान २.५ वर्ष अनुभव धारक असावा.
▪वसतिगृह वॉर्डन : उमेदवार एन.सी.ई.आर.टी. किंवा इतर एन.सी.टी.ई. मान्यताप्राप्त संस्थेच्या प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयातून पदवीधर किंवा ४ वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
▪लेखापाल (अकाउंटंट) : उमेदवार बी.कॉम (वाणिज्य) पदवी धारक असावा.
▪कनिष्ठ सचिवीय सहाय्यक : उमेदवार इय्यता १२ वी उत्तीर्णसह इंग्रजी टायपिंग ३५ प्रति/मिनिट किंवा हिंदी टायपिंग ३० प्रति/मिनिट वाणिज्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
▪प्रयोगशाळा परिचर (लॅब अटेंडंट) : उमेदवार इय्यता १० वी उत्तीर्णसह प्रयोगशाळा तंत्र डिप्लोमा/ प्रमाणपत्र किंवा इय्यता १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण उत्तीर्ण असावा.
◾एकूण पदे : 07267 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 23 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या
