Sainik Kallyan Vibhag Maharashtra Bharti 2025 : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी लिपिक टंकलेखक गट “क” या पदाकरीता अटींची पुर्तता करणाऱ्या फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
उमेदवाराने ऑनलाईनव्दारे भरलेले अर्ज (Application Form) व प्रवेशप्रमाणपत्र (Hall Ticket) ची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करुन घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. संभाव्य बदला बाबत वेळोवेळी सैनिक कल्याण विभागाच्या संकेत स्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
आवश्यक कागदपत्र
1) परीक्षेस येतेवेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
2) परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात लेखी परीक्षेच्या वेळी मोबाईल फोन, गणक यंत्र (कॅलक्यूलेटर) अथवा इतर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधन आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.
3) ऑनलाईन अर्ज अचूक भरण्याची जबाबदारी अर्जदार यांची राहील. त्या अनुषंगाने कोणतीही तक्रार नंतर विचारात घेतली जाणार नाही. अपात्र अर्जदारांना स्वतंत्ररित्या कळविले जाणार नाही. उमेदवारांना लेखी परिक्षेसाठी स्वखर्चाने हजर रहावे लागेल.
4) उमेदवारांची लेखी परिक्षा त्यांचे प्रवेशप्रमाणपत्रा मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी घेण्यात येईल. लेखी परिक्षेअंती उमेदवारांचे प्राप्त गुण, जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता अंतरिम स्वरुपात यादी जाहीर करण्यात येईल. ज्या उमेदवारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता मुळ कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिध्द होईल अशाच उमेदवारांचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरीता करण्यात येईल.
इतर माहिती
(एक) अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील.
(दोन) अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ
