कृषी समृध्दी योजनेअंतर्गत जिल्हा नावीन्यपूर्ण योजना अंमलबजावणीबाबत… नवीन परिपत्रक. Krushi Samrudhi Yojana
Krushi Samrudhi Yojana:कृषि समृद्धी योजनेतर्गत जिल्हा नाविन्यपूर्ण योजना अंमलबजावणीबाबत.
संदर्भ :-
१. शासन निर्णय क्रसो-२०२५/प्र.क्र.२१७/११-से दि. २२ जुलै, २०२५.
२. या कार्यालयाचे पत्र जा. क्र./ कृआ / कृषी समृद्धी योजना/र-२४५/२०२५ दिनांक :१२/०९/२०२५.
उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये राज्यात कृषि समृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. संदर्भीय शासन निर्णयान्वये जिल्हा स्तरावरील स्थानिक गरजा लक्षात घेऊन गरजेनुसार प्रस्तावित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना राबविण्याबाबत संदर्भक्र. २ अन्वये अंमलबजावणी बाबतची कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनांसाठी राज्यस्तरावरून सन २०२५-२६ करिता रुपये ५०० कोटी निधी निर्धारित केलेला आहे. सदरच्या जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना अंमलबजावणीबाबत जिल्ह्यांकडून विचारणा होत आहे.
या पत्रान्वये आपणास सूचित करण्यात येते की, कृषि समृद्धी योजनेतर्गत “जिल्हा नाविन्यपूर्ण योजनेत” सद्यस्थितीत पुढील आदेश होईपर्यंत कोणतेही दायित्व निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. त्यानुसार जिल्हास्तरीय नाविण्यपूर्ण योजनांमध्ये कोणतीही योजना कार्यान्वित करण्याबाबतची अंमलबजावणी करण्यात येवू नये.


