Ladki bahin Yojana: लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

Ladki bahin Yojana : राज्याची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना मे महिन्या पर्यंत सर्व हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आणि आता महिलांना जून महिन्याचा हप्ता कधी दिला जाणार याची प्रतीक्षा आहे.

सर्व महिला या जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे . विशेषता: आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांतील महिला. आता प्रत्येक महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होत आहे की जून महिना संपायला फक्त 10 दिवस बाकी आहे . यामुळे बऱ्याचशा महिलांकडून महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न वारंवार विचारण्यात येत आहे. तर आज आपण या लेखांमध्ये लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी दिला जाणारी याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण (Ladki bahin Yojana) योजनेअंतर्गत मागचा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला होता . त्यानंतर आता अनेक महिला असा प्रश्न विचारत आहात की जून महिन्याचा हप्ता कधी दिला जाणार? लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना जून महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न अनेक महिला विचारत आहेत. तर पात्र असणाऱ्या महिलांना महिना अखेरपर्यंत म्हणजेच पुढच्या दोन आठवड्यात हे पैसे सरकारकडून दिले जाऊ शकतात परंतु लक्षात असू द्या. याबाबत अध्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही किवा तारीख निश्चित झालेली नाही.

लाडकी बहीण योजनेची पैसे या महिलांना मिळणार नाही?

लाडकी बहीण (Ladki bahin Yojana) योजनेअंतर्गत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत ?. यामागचं कारण म्हणजे काही लाडक्या बहिणीने निकषा बाहेर जाऊन अर्ज केले होते. असे अर्ज केलेल्या महिलांना आता या योजनेतून बाद करण्यात आले आहे. त्यामुळे आता या महिलांना पैसे मिळणार नाहीत या योजनेच्या सुरुवातीला सरकारने काही अटी आणि नियम निश्चित करण्यात आले होते. त्या नियमांचे उल्लंघन करून ज्या महिलांनी लाभ घेतला होता अशा महिला आता वगळण्यात आले आहेत .

Ladki bahin Yojana याच महिला पात्र

लाडकी बहीण योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलाच पात्र आहेत. इतर राज्यातील महिलांना लाभ घेता येणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच महिलेच्या नावावर कोणतेही चारचाकी वाहन नसावे. ज्या महिलांना इतर शासकीय योजनेतून आर्थिक लाभ मिळत आहे त्या महिला देखील या योजनेत अपात्र आहेत. जर तुम्ही या सर्व निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

Leave a Comment