नवीन भरती 2025 Menu महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागात गट-ड (वर्ग-४) पदांची भरती

Maharashtra Government Jobs 2025 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई संचालनालय, वैद्यकीय शिक्षण संशोधन, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

भरती विभाग : महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई संचालनालय, वैद्यकीय शिक्षण संशोधन, मुंबई द्वारे ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾एकूण पदे : 0263 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदे : गट ड (Group D)
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 47,600 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे. 

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.
◾पदाचे नाव : शिपाई, शवविच्छेदन अटेंडंट, शवविच्छेदन कक्ष अटेंडंट, प्रयोगशाळा अटेंडंट, प्रयोगशाळा सेवक, वसतिगृह सेवक, सुरक्षा रक्षक, डार्करूम अटेंडंट, रूम अटेंडंट/रुग्ण अटेंडंट, औषध वितरण अटेंडंट, बाह्यरुग्ण अटेंडंट, अपघात वॉर्ड अटेंडंट, सर्जिकल अटेंडंट, डार्करूम अटेंडंट, एक्स-रे अटेंडंट, रक्तपेढी अटेंडंट, रुग्ण पोर्टर, सहाय्यक स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक/पालक, माळी, वॉशरमन, नाई, वाहन चालक, पॅरामेडिक, स्वयंपाकी, खोली अटेंडंट, वॉचमन, दवाखाना अटेंडंट, सर्जन सहाय्यक, व्रण उपचार, रक्तपेढी अटेंडंट, विमान चालक, नर्सिंग अटेंडंट, मिस्टर कम फिटर सुतार, कार्यशाळेतील अटेंडंट, वॉटरमन, शिंपी, दंत सहाय्यक, स्वच्छता सेवा, दासी/आया.
◾इतर आवश्यक पात्रता :
अ) उमेदवार कोणत्याही शासनमान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परिक्षा [१० वी] उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सर्व पदांकरीता सामाईक अर्हता.)
आ) न्हावी या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अर्हते सह औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडील (I.T.I.) केश कर्तनालय प्रमाणपत्र अभ्याक्रम पुर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
इ) सहाय्यक स्वयंपाकी या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अर्हते सह कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक करता असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
ई) प्रयोगशाळा परिचर पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) शाख (विज्ञान) विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
उ) माळी या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अर्हते सह माळी प्रमाणपत्र.
ऊ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
◾अर्ज शुल्क: खुल्या वर्गासाठी 1,000/- रुपये आणि राखीव वर्गासाठी 900/- रुपये.
◾नोकरी ठिकाण : मिरज-सांगली.
◾अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीव्दारे स्वीकारण्यात येतील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : ०७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत