पात्रता
• पदवी प्राप्त केल्यापासून दिनांक ०१/११/२०२५ रोजी ३ वर्षे पूर्ण होणारा पदवीधारक
• मराठवाड्यातील रहिवासी (छत्रपती संभाजीनगर,जालना,परभणी,हिंगोली,नांदेड,लातूर,धाराशिव,बीड)
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
• कोणत्याही विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीच्या अंतिम वर्षाच्या उत्तीर्ण गुणपत्रकेची झेरॉक्स प्रत
• पासपोर्ट साईज फोटो
• मतदान ओळखपत्र/आधार कार्ड यापैकी एकाची झेरॉक्स प्रत
• नाव बदल असल्यास गॅझेट / विवाह नोंदणी प्रमाणपत्र / पॅनकार्ड
नोंदणीची मुदत- ३० सप्टेंबर २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५
महत्त्वाची सूचना
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी दरवेळी नव्याने तयार करण्यात येते. त्यामुळे गतनिवडणुकीमध्ये मतदार नोंदणी केली असेल तरीही यावेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे.

