Gold Rate Today On Dhanteras 2025: आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. आज धनत्रयोदशी असून या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. आजच्याच दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं आजच्या सणासुदीच्या दिवसांत ग्राहक सोनं-चांदीचे दागिने खरेदी करु शकणार आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहक सोनं-चांदीत गुंतवणुक करू शकणार आहात
धनत्रयोदशीच्या आधीच गुंतवणुकदार आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक तेजी गेल्या काही दिवसांपूर्वी दिसून आली होती. मात्र आता चांदीचे दर 10,000 रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. MCX वर आज चांदीने 1,70,415 रुपये प्रति किलोग्रॅमवर उच्चांकी दर नोंदवला होता.
त्यानंतर यात मोठी घट दिसून आली. सोन्याचे दरदेखील साधारण 4000 रुपयांपर्यंत खाली घसरली आहे. अचानक झालेल्या घसरणीनंतर सराफा बाजारात एकच खळबळ उडाली आहे. ग्राहकांना खरेदीसाठीची एक संधी मिळाली आहे. आज MCX वर सोनं 1,30,860 रुपयांवर पोहोचले आहे


