Gold Rate : आजच्या बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठा फरक पाहायला मिळालेला नाही. मात्र, आठवड्याच्या सुरुवातीला सोनं आणि चांदी थोडे खाली आलेले दिसले. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सतत वाढत असल्याने ग्राहक हैराण झाले होते, पण आज थोडा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, उत्सवाच्या काळात सोन्याच्या भावात होणारा चढ-उतार सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा ठरतो.
आज MCX वर सोन्याचा ऑक्टोबर वायदा ५० रुपयांनी घसरून १,००,३३७ रुपयांवर पोहोचला आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ९३,०५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १,०१,५१० रुपये आहे. चांदीबाबत बोलायचे झाले तर १ किलो चांदीची किंमत १,२१,००० रुपये झाली असून, आज ती तब्बल १,००० रुपयांनी वाढलेली आहे. सराफा बाजारात मात्र दागिन्यांच्या किमतींमध्ये १०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या खरेदीत ग्राहकांची मोठी गर्दी दिसू शकते.
बुलियन मार्केटच्या माहितीनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,६३० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,३२८ रुपये आहे. १ किलो चांदीची किंमत ११४,२६० रुपये तर १० ग्रॅम चांदीचा दर १,१४३ रुपये आहे. याशिवाय उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे दागिन्यांच्या किमती शहरानुसार वेगळ्या असतात.

